HomeपांचगणीPanchgnai news : पाचगणी पोलिसांची 'हॅट्ट्रिक'! एकाच महिन्यात तीन पुरस्कारांनी सन्मानित; सपोनि...

Panchgnai news : पाचगणी पोलिसांची ‘हॅट्ट्रिक’! एकाच महिन्यात तीन पुरस्कारांनी सन्मानित; सपोनि दिलीप पवार आणि टीमचे सर्वत्र कौतुक!

पाचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी: कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रभावी पालन करत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पाचगणी पोलीस ठाण्याने ऑक्टोबर २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेत एकाच महिन्यात तब्बल तीन पुरस्कारांनी पोलीस ठाण्याला सन्मानित करण्यात आले असून, पुरस्कारांची ‘हॅट्ट्रिक’ साधल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) दिलीप पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

​ऑक्टोबर २०२५ मध्ये पाचगणी पोलीस ठाण्याने तीन महत्त्वाचे सन्मान पटकावले. यामध्ये, सायबर गुन्ह्यांचा यशस्वी आणि जलद गतीने तपास केल्याबद्दल सपोनि दिलीप पवार, पोलीस शिपाई अमोल जगताप आणि उमेश लोखंडे यांना उत्कृष्ट सायबर तपास पुरस्कार मिळाला. याशिवाय, महिला अत्याचारासंबंधी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अत्यंत तत्परता दाखवत केवळ २४ तासाच्या आत मा. न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्याच्या प्रभावी कामगिरीबद्दल सपोनि दिलीप पवार, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे आणि रेखा तांबे यांचा गौरव करण्यात आला. तसेच, पोलीस ठाण्याच्या एकूण चांगल्या कामगिरीबद्दल ‘उत्तेजनार्थ प्रमाणपत्र’  देखील प्रदान करण्यात आले, जे सपोनि दिलीप पवार आणि पोलीस शिपाई अमित कुंभार यांनी स्वीकारले.

​सातारा तालुका पोलीस ठाणे शेजारील शिवतेज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पाचगणी पोलीस ठाण्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला. एका महिन्यात तीन महत्त्वाचे पुरस्कार मिळवून पाचगणी पोलिसांनी उत्कृष्ट कार्यक्षमतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सपोनि दिलीप पवार आणि त्यांच्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!