HomeपांचगणीPanchgani news: पाचगणीच्या आकाशात जागतिक थरार! ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०२६’चे दिमाखदार उद्घाटन;...

Panchgani news: पाचगणीच्या आकाशात जागतिक थरार! ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०२६’चे दिमाखदार उद्घाटन; २५ देशांतील २५० स्पर्धकांचा सहभाग

पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी  : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य पाचगणीच्या आकाशात आजपासून जागतिक स्तरावरील साहसी खेळांचा महाकुंभ सुरू झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि ‘हाय फ्लाय पॅराग्लायडिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०२६’चे आज अत्यंत उत्साहात उद्घाटन झाले. आतापर्यंत प्रामुख्याने युरोपीय देशांची मक्तेदारी असलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद यंदा प्रथमच भारताला आणि त्यातही आपल्या पाचगणी शहराला मिळाल्याने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

खासदार नितीन काका पाटील यांच्या शुभहस्ते या भव्य स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी अधोरेखित केले की, या स्पर्धेच्या निमित्ताने पाचगणीची ओळख केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून मर्यादित न राहता, जागतिक स्तरावरील ‘पॅराग्लायडिंग हब’ म्हणून निर्माण होणार आहे. साताऱ्याच्या डोंगरदऱ्यांतील निसर्गाचे वरदान आता जागतिक साहसी पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे चमकणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

या स्पर्धेसाठी जगातील सुमारे २५ देशांतील २०० नामांकित धाडसी स्पर्धक पाचगणीत दाखल झाले असून, १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आकाशात रंगीबेरंगी पॅराग्लायडर्सची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या पारदर्शक परीक्षणासाठी पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप असोसिएशनचे अध्यक्ष श्री. गोरान यांच्यासह जागतिक दर्जाचे तज्ज्ञ पंच आणि तांत्रिक समिती उपस्थित आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. पाचगणीकर आणि पर्यटकांनी या जागतिक थराराचा अनुभव घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या ऐतिहासिक सोहळ्याला पाचगणी नगरपालिकेचे अध्यक्ष दिलीप बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे दांडेघरच्या सरपंच सृष्टी खरात, माजी सरपंच शंकर कळंबे, नगरसेवक परवीन मेमन, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, सुप्रिया माने यांच्यासह वर्ल्ड कप असोसिएशनच्या टेक्निकल टीममधील कृष्णकांत भागरा, श्री. दोहरा यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन ‘हाय फ्लाय पॅराग्लायडिंग’चे चेअरमन अनुपम जाधव पाटील यांनी केले. २१ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेमुळे संपूर्ण पाचगणी परिसरात सध्या उत्साहाचे आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

  1. चौकट : युरोपची मक्तेदारी मोडीत!
    आजवर केवळ युरोपीय देशांतच रंगणारा हा जागतिक थरार पाचगणीच्या टेबल लँड आणि दांडेघरच्या डोंगररांगांमध्ये अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा केवळ खेळ नसून पाचगणीच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला जागतिक भरारी देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!