पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : श्रीमती कांताबेन जे. पी. मेहता जुनिअर कॉलेज, पांचगणी, येथील विज्ञान विभागातर्फे शुक्रवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘फळ आणि पालेभाज्या प्रदर्शन’ उत्साहात भरवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये फळे व भाज्यांच्या आहारातील महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य, एस. एन. बिले सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एस. एम. एम. सिनियर कॉलेज, पांचगणी, येथील उप-प्राचार्य डॉ. बी. एन. कोकरे सर हे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील प्रा. पारधी सर, प्रा. बोधगिरे सर, प्रा. कांबळे सर, प्रा. पवार मॅडम, प्रा. पाटील सर, प्रा. दराडे सर, प्रा. म्हेत्रे सर, श्री. वर्णे सर, आणि इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ. बी. एन. कोकरे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना फळभाज्या व पालेभाज्या यांचे आरोग्यासाठी असलेले अमूल्य महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. बिले सर यांनीही या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाज्यांमध्ये असणारे महत्त्वाचे घटक आणि त्यांचे मानवी जीवनातील महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले.
प्रदर्शनाच्या पाहणीदरम्यान, अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक भाजीचे महत्त्व, त्यातील घटक, आवश्यक मूलद्रव्ये, रासायनिक घटक आणि त्यांचे उपयोग यासंबंधीची माहिती अत्यंत आत्मविश्वासपूर्वक शिक्षक व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी केलेले हे शानदार सादरीकरण उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे होते.
या संपूर्ण प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन प्रा. वर्षा कासुर्डे आणि विज्ञान विभागातील सर्व स्टाफ यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा कासुर्डे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रा. पवार मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदत करणाऱ्या सर्व उपस्थितांचे आणि आयोजकांचे आभार प्रा. सुनील कांबळे यांनी मानले.
या कार्यक्रमास आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स विभागातील सर्व स्टाफ व विद्यार्थी, तसेच हायस्कूल स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यपूर्ण आहाराबद्दल अधिक जाणीव निर्माण झाली.
























