Homeनवी मुंबईPanchgani news : जावळी-महाबळेश्वरच्या लेकीला नवी मुंबईत मोठे जनसमर्थन; अश्विनी बेलोशे यांच्या...

Panchgani news : जावळी-महाबळेश्वरच्या लेकीला नवी मुंबईत मोठे जनसमर्थन; अश्विनी बेलोशे यांच्या विजयासाठी शशिकांत शिंदेंचे ‘रणशिंग’!

पाचगणी न्यूज नेटवर्क
​नवी मुंबई (कोपरखैरणे): नवी मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १२ ‘क’ मध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील जावळी-महाबळेश्वर तालुक्यातील काटवली गावची सुनबाई अश्विनी सुयोग बेलोशे यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)’ पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून, त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः कोपरखैरणे विभागात राहणाऱ्या जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातील मतदारांनी अश्विनी बेलोशे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे.

​शशिकांत शिंदे यांच्या सभेने प्रचारात आली ‘भरारी’
​काल पार पडलेल्या भव्य प्रचारसभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जावळीचे सुपुत्र ना. शशिकांत शिंदे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह फुंकला. यावेळी बोलताना शिंदे साहेब भावूक झाले, ते म्हणाले ​”जेव्हा नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते, तेव्हा परिवर्तनाची लाट येते. अश्विनी बेलोशे या केवळ उमेदवार नसून आपल्या हक्काच्या प्रतिनिधी आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.”

​शशिकांत शिंदे साहेबांनी दिलेली ही भेट आणि व्यक्त केलेला विश्वास हा अश्विनी बेलोशे यांच्या विजयाचा शुभसंकेत मानला जात आहे.
​ “आपली माणसं, आपला विकास”
​कोपरखैरणे परिसरात मोठ्या संख्येने सातारा, जावळी आणि महाबळेश्वर पट्ट्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. आपल्या भागातील एक सुशिक्षित आणि कष्टाळू सून महापालिकेत आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे. अश्विनी बेलोशे यांना मिळणारा पाठिंबा पाहता, हा लढा आता केवळ एका उमेदवाराचा नसून संपूर्ण “जावळी-महाबळेश्वर” परिवाराचा सन्मान बनला आहे. यावेळी सुयोग बेलोशे , मारुती बेलोशे व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

​प्रभाग क्रमांक १२ ‘क’ मधील सर्व सुज्ञ मतदारांना विनंती करण्यात येत आहे की, आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी अश्विनी सुयोग बेलोशे यांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आवाहन यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!