Homeनवी मुंबईPanchgani news : कामगार चळवळीला नवे बळ; राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) नवी...

Panchgani news : कामगार चळवळीला नवे बळ; राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी महेश भणगे यांची निवड

पांचगणी न्यूज नेटवर्क 

नवी मुंबई / वाई : कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी लढा देणाऱ्या ‘राष्ट्रीय मजदूर काँग्रेस’ (इंटक) संघटनेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी आकोशी (ता. वाई) येथील सुपुत्र महेश विष्णू भणगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र ‘इंटक’चे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या मान्यतेने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महेश भणगे यांच्या निवडीचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले असून, यामुळे नवी मुंबईतील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार चळवळीला आता नवी उभारी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

​मूळचे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आकोशी गावचे रहिवासी असलेले महेश भणगे यांनी आपल्या कामाच्या जोरावर नवी मुंबईत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीची माहिती ज्येष्ठ समाजसेवक रघुनाथ भणगे यांनी दिली असून, त्यांच्या या यशाबद्दल वाई तालुक्यासह नवी मुंबईत आनंदाचे वातावरण आहे. नवी मुंबईतील कामगारांचे प्रश्न सोडवणे, संघटना अधिक मजबूत करणे आणि ‘महाराष्ट्र इंटक’चा नावलौकिक वाढवणे, हा विश्वास प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी नियुक्ती पत्राद्वारे व्यक्त केला आहे. कामगार क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा येणाऱ्या काळात सामान्य कष्टकऱ्यांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

​महेश भणगे यांच्या या निवडीनंतर राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवी मुंबईतील नेरूळसह विविध भागांत त्यांचे स्वागत केले जात असून, “सामान्यांच्या हक्कासाठी लढणारा एक अभ्यासू नेता” अशा शब्दांत त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या निवडीमुळे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, आगामी काळात कामगारांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी ते कशा प्रकारे पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या भावी वाटचालीस त्यांनी सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!