HomeपांचगणीPanchgani news : पाचगणीच्या विकासपर्वाचा श्रीगणेशा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा होणार...

Panchgani news : पाचगणीच्या विकासपर्वाचा श्रीगणेशा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा होणार कायापालट

पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: पाचगणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील सांस्कृतिक भवनाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या शुभहस्ते आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक नारायणशेठ बिरामणे व सुप्रिया माने यांनी निवडणुकीत दिलेल्या शब्दाला जागत आपल्या प्रभागातूनच शहराच्या पहिल्या विकासकामाची मुहूर्तमेढ रोवल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या सोहळ्याला श्री घाटजाई शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा फौजफाटा उपस्थित होता. यामध्ये आघाडी प्रमुख आणि नगरसेवक शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामणे, प्रकाश गोळे, महेश खांडके, राजेंद्र पारठे, अमित कांबळे, आकाश बगाडे तसेच नगरसेविका परवीन मेमन, विमल भिलारे, राजश्री सणस, स्वाती कांबळे, अमृता गोळे, शिल्पा माने, माधुरी कासुर्डे आणि सुप्रिया माने यांचा समावेश होता. लोकप्रतिनिधींनी पदभार स्वीकारताच कामाचा धडाका लावल्याने स्थानिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील नागरिक व पंचशील युवक मंडळ यांच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात प्रकाश मोरे (गुरुजी) यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतानाच प्रभागातील रखडलेल्या कामांची वस्तुस्थिती मांडली.

आगामी काळात परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी ऍस्टनचे संचालक अमर बिरामणे, उद्योजक महेश माने, प्रशांत मोरे, संस्थेचे सेक्रेटरी नितीन कांबळे, संचालक संपत खरात, माजी उपाध्यक्ष सतीश साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते अरुण कांबळे, हौसाताई गायकवाड, रंजना घाडगे, सुनीलभाऊ भोसले, कुमार कांबळे, संदीप गायकवाड, सिद्धार्थ घाडगे, सुरज कांबळे, किशोर मस्के, शब्देश मोरे, मोहिनी गायकवाड, कमलताई शिंदे, सागर बोलके, विकास बिरामणे आणि राकेश मोरे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सुशोभीकरणामुळे सांस्कृतिक भवनाला आधुनिक रूप प्राप्त होणार असून, भविष्यात येथील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांना मोठी गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

पत्रकार दिनानिमित्त विशेष सन्मान
कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त विशेष गौरव करण्यात आला. समाजप्रबोधनाच्या कार्यात पत्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत मान्यवरांनी त्यांच्या लेखणीचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!