पाचगणी न्यूज नेटवर्क
नवी मुंबई (कोपरखैरणे): नवी मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १२ ‘क’ मध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील जावळी-महाबळेश्वर तालुक्यातील काटवली गावची सुनबाई अश्विनी सुयोग बेलोशे यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)’ पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून, त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः कोपरखैरणे विभागात राहणाऱ्या जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातील मतदारांनी अश्विनी बेलोशे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे.
शशिकांत शिंदे यांच्या सभेने प्रचारात आली ‘भरारी’
काल पार पडलेल्या भव्य प्रचारसभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जावळीचे सुपुत्र ना. शशिकांत शिंदे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह फुंकला. यावेळी बोलताना शिंदे साहेब भावूक झाले, ते म्हणाले ”जेव्हा नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते, तेव्हा परिवर्तनाची लाट येते. अश्विनी बेलोशे या केवळ उमेदवार नसून आपल्या हक्काच्या प्रतिनिधी आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.”
शशिकांत शिंदे साहेबांनी दिलेली ही भेट आणि व्यक्त केलेला विश्वास हा अश्विनी बेलोशे यांच्या विजयाचा शुभसंकेत मानला जात आहे.
“आपली माणसं, आपला विकास”
कोपरखैरणे परिसरात मोठ्या संख्येने सातारा, जावळी आणि महाबळेश्वर पट्ट्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. आपल्या भागातील एक सुशिक्षित आणि कष्टाळू सून महापालिकेत आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे. अश्विनी बेलोशे यांना मिळणारा पाठिंबा पाहता, हा लढा आता केवळ एका उमेदवाराचा नसून संपूर्ण “जावळी-महाबळेश्वर” परिवाराचा सन्मान बनला आहे. यावेळी सुयोग बेलोशे , मारुती बेलोशे व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १२ ‘क’ मधील सर्व सुज्ञ मतदारांना विनंती करण्यात येत आहे की, आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी अश्विनी सुयोग बेलोशे यांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आवाहन यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केले.
























