HomeपांचगणीPanchgani news : राजपुरी शाळेचा कायापालट; दीड कोटींच्या निधीतून साकारणार अद्ययावत इमारत;...

Panchgani news : राजपुरी शाळेचा कायापालट; दीड कोटींच्या निधीतून साकारणार अद्ययावत इमारत; ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ अभियानातील विजेत्या शाळेत आता शिष्यवृत्तीचा पॅटर्नही गाजणार

पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक रात्रंदिवस मेहनत घेत असून, या शाळांमधून आता जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. पालकांनी खासगी शाळांच्या मागे न लागता आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळांत प्रवेश देऊन प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रसेठ राजपुरे यांनी केले.

राजपुरी (ता. महाबळेश्वर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन व प्रशस्त इमारत बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. हे गाव राजपुरे यांचे स्वग्राम असून आपल्या गावातील शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, ही शाळा ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात विजेती ठरली असून, या ठिकाणी राबविला जाणारा शिष्यवृत्ती परीक्षेचा ‘पॅटर्न’ जिल्ह्यासाठी पथदर्शक ठरत आहे.

या प्रकल्पांतर्गत सुमारे दीड कोटी रुपयांची विकासकामे प्रस्तावित आहेत. यामध्ये सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज अशी भव्य शाळा इमारत, स्वच्छतागृहे, हॅन्डवॉश स्टेशन आणि परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पेव्हर्स ब्लॉकचा समावेश आहे. ही सर्व कामे येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा मानस राजपुरे यांनी व्यक्त केला. गावातच इंग्रजी माध्यमाच्या तोडीचे शिक्षण आणि सुसज्ज इमारत उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या सोहळ्यास सरपंच शीतल विश्वास राजपुरे, उपसरपंच शंकर राजपुरे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र भिलारे, केंद्रप्रमुख संजय पारठे, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रवी भिलारे, खिंगरचे मुख्याध्यापक संतोष पारठे, अमित कारंडे, राजपुरीच्या सरपंच शीतलताई राजपुरे, उपसरपंच शंकर राजपुरे ,पोलिस पाटील अजय राजपुरे, अशोक राजपुरे, आनंद राजपुरे, विश्वास राजपुरे,अश्विनी राजपुरे, भीमसेन राजपुरे, शांताराम राजपुरे, बाळासाहेब घाडगे ,श्रीकांत राजपुरे,दत्तात्रय राजपुरे, बाळासाहेब राजपुरे,विलास राजपुरे , दत्तू आण्णा राजपुरे,मारुती राजपुरे, रोहिदास राजपुरे,गंगाधर राजपुरे, शामराव राजपुरे,महादेव भिलारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप राजपुरे, ग्रामपंचायत अधिकारी अमोल धुमाळ मुख्याध्यापक अरविंद चोरट, उद्धव निकम,अमोल गायकवाड,निलोफर सय्यद तसेच गावातील ग्रामस्थ पालक ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पोळ यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!