पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : स्वदेशी’ चळवळीला ‘आत्मनिर्भर भारत’मुळे अधिक गती मिळणार आहे, आत्मनिर्भर भारत योजनेमुळे स्वदेशी वस्तूंच्या वापरावर अधिक जोर दिला जात आहे. यामुळे सर्वांनी स्वदेशी वस्तूच खरेदी कराव्यात जेणेकरून स्थानिक कारागीर आणि उद्योजकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सर्वांनी स्वदेशीचा स्वीकार करण्यावर भर द्यावा असे आवाहन भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल नाना भिलारे यांनी केले.
पाचगणी शहर व परिसरात प्रत्येक घरी स्वदेशी व घरोघरी स्वदेशी या संकल्प योजनेचा शुभारंभ करताना श्री. भिलारे बोलत होते. यावेळी भाजपचे मंडळ सर चिटणीस अनिल बोधे, जगन्नाथ भिलारे, भाजप उपाध्यक्ष माधव बाचल , जिल्हा उपाध्यक्ष संतोष कवी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पांचगणी शहरातील सर्व व्यावसायिक आणि घरोघरी जाऊन स्वदेशी संकल्प पत्र भरून घेण्यात आली व स्वदेशी योजनेची माहिती सांगून जनजागृती करण्यात आली. या संकल्प यात्रेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना संतोष कवी म्हणाले आत्मनिर्भर भारत ही केवळ एक योजना नाही, तर ती एक विचारसरणी आहे. ती आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवते. या चळवळीत आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवे. आपल्या देशातील वस्तू वापरून आपण देशाच्या विकासात हातभार लावू शकतो. असे सांगितले.
























