Homeपांचगणीपांचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी श्री. पंडित पाटील यांची नियुक्ती : जुन्या मुख्याधिकारी...

पांचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी श्री. पंडित पाटील यांची नियुक्ती : जुन्या मुख्याधिकारी यांची २१ दिवसात गंछती

पांचगणी न्यूज नेटवर्क / प्रमोद रांजणे
पांचगणी : गेले काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित पाटील यांची नियुक्ती झाली आहे. यामुळे मी येणार येणार म्हणत खुर्चीवर आलेल्या अतिरिक्त मुख्याधिकारी यांची तडकाफडकी बदली झाल्याने श्री जाधव यांची गंछती झाली असल्याचे बोलले जात आहे.

नगरविकास विभागाच्या अवर सचिवांकडून प्रतिनियुक्तीवर या नेमणुकीचे आदेश काढले आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी निखिल जाधव यांची २० मार्च २०२४ रोजी बदली झाल्याने ही जागा काही दिवस रिक्त होती. त्यानंतर त्याचा अतिरिक्त कार्यभार महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी यांचेकडे होता. परंतु निखिल जाधव यांची सांगली महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी बढती मिळाली. परंतु जुन्या पाचगणी नगरपालिकेत आपला जीव अडकून राहिलेल्या जाधव यांनी अगदी वरिष्ठ पातळीवरून फिल्डिंग लावत नामदार मकरंद आबा पाटील तसेच स्थानिक नेते व कार्यकर्ते यांची नाराजी ओढवून घेतली व ५ जूनला पुन्हा पांचगणी पालिकेचा अतिरिक्त कार्यभार मिळवला.

मी येणार येणार म्हणत निखिल जाधव यांनी स्थानिक आमदार व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती. यामध्ये निखिल जाधव यांची झालेली बदली स्थानिक नेतृत्वाच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी निखिल जाधव यांच्या बदलीसाठी आपली ताकद पणाला लावली. यात यशस्वी होत त्यांनी २१ दिवसात निखिल जाधव यांना स्वगृही पाठवत पंडित पाटील यांना पांचगणी नगरपालिकेत नियुक्ती मिळवून दिली.

नवे मुख्याधिकारी पंडित पाटील यांचे मूळगाव आरग (ता. मिरज) आहे. २०१० साली पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली. त्यानंतर पहिली नियुक्ती माझलगाव (जि. बीड) येथील नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून झाली. त्यानंतर सांगलीतील जत, लोणावळा,साता-यातील म्हसवड व कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेत त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले. त्यानंतर बढती मिळाल्याने सांगली-मिरज व कुपवाड महापालिकेच्या उपायुक्तपदची जबाबदारी मिळाली. आता पंडित पाटील हे कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त होते. तेथून आज ते पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!