
पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पांचगणी – महाबळेश्वर या पर्यटन स्थळावर आपल्या मनातले घर असाव अशी इच्छा असणाऱ्या लोकांना आपल्या स्वप्नातील.घर निर्माण करणाऱ्या यश कन्स्ट्रक्शनचे संचालक प्रशांत मोरे यांना आज उत्कृष्ट उद्योजक म्हणून डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघाचे वतीने महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५ देऊन गौरवण्यात आले.
हा पुरस्कार प्रशांत मोरे यांचे बंधू प्रदीप मोरे यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.जयकुमार गोरे , आयुष्मान भारत मिशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे , प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने तसेच संस्थेचे पदाधिकारीं उपस्थित होते.
हा सोहळा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना,महाराष्ट्र – मुंबई यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’, ‘महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार २०२५’ आणि ‘डिजिटल स्टार पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.
पांचगणी या पर्यटन स्थळावर सर्वसामान्यांना वास्तू निर्मिती करून देण्यासाठी सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील प्रशांत मोरे यांनी आपल्या यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सुन्दर वास्तू बांधून त्यांच्या मनात आपले आगळे वेगळे स्थान मिळणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रशांत मोरे यांचे नाव घेतले जाते. या कामाबरोबरच त्यांनी सामाजिक सेवेत सुधा आपला वेगळा ठसा उमटवला आहे. गोर गरीबांना मदत करण्यात मोरे आघाडीवर असतात. खेळ, सामाजिक सेवा, ग्राम विकास यावर त्यांनी भर देत अनेक कामे उभी केली आहेत. त्यांचा शांत स्वभाव व मदतीला धाऊन जाण्याची सवय यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटतात. यामुळे त्यांच्या या कामाची दखल घेत प्रशांत मोरे याना आज गौरवण्यात आले. स्मृतिचिन्ह शाल ,श्रीफळ देवून त्यांना गौरवण्यात आले.
या पुरस्काराबद्दल प्रशांत मोरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
























