पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी डॉ.वृषाली हिने सुरू केलेल्या विजया क्लिनिकमुळे दांडेघर व परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी केले.
दांडेघर (ता.महाबळेश्वर) येथे डॉ.वृषाली राजेंद्र कळंबे हिने सुरू केलेल्या विजया क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी राजपुरे बोलत होते.यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रविण भिलारे,शशिकांत (बापू) भिलारे,पसरणी गावचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिर्के, डॉ.रमेश जाधव,राजेंद्र रामचंद्र कळंबे, नितीन कळंबे,दिलिप आंब्राळे,नितीन भाई भिलारे,कळंबे महाराज बॅंकेचे संचालक विनोद कळंबे,दांडेघरच्या सरपंच सृष्टी खरात, उपसरपंच जनार्दन कळंबे, माजी सरपंच शंकरराव कळंबे, पोलिस पाटील योगिता खरात, नारायणशेठ बेलोशे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका उषा माने, माजी पोलिस पाटील पांडुरंग कळंबे, ग्रामपंचायत सदस्य रेखा कळंबे, अशोक कासुर्डे, आनंद मराठे,राजू खामकर,विजय हाडिया, आशा सेविका शोभा कळंबे, रविंद्र कळंबे बजरंग पवार, दत्तात्रय कळंबे, किसन कासुर्डे, महेंद्र रांजणे, गजानन शंकर कळंबे, सुधिर कळंबे,दत्ता नारायण कळंबे,मा.उपसरपंच सुरेखा पवार,लक्ष्मण कळंबे, जयदीप कळंबे, शिक्षक बॅंक कर्मचारी अशोक खरात, संतोष कळंबे, ज्ञानेश्वर कळंबे, ग्रामस्थ, महिला आदी मान्यवर उपस्थित होते.
राजपुरे पुढे म्हणाले गावातच दवाखाना सुरू झाल्याने दांडेघर व परिसरातील नागरिकांसाठी उत्तम रुग्णसेवा माफक दरांमध्ये उपलब्ध होणार असून नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.
नानासाहेब कासुर्डे म्हणाले डॉ.कु. वृषाली ही दांडेघर गावची पहीली डॉक्टर बनली. तीने गावाबरोबरच पाचगणी परीसराची मान उंचावली असून याच मातीत जन्मलो त्याच मातीतील.लोकांची सेवा करण्याचा डॉ वृषाली यांचा यांचा मानस खरोखरच इतरांना प्रेरणादाई आहे. असे सांगितले.
यावेळी राजेंद्र कळंबे यांनी सर्वांचे स्वागत केले तर नितीन कळंबे यांनी आभार मानले..
























