HomeमेढाPanchgani news : महाशिवरात्र निमित्त जावळी तालुक्यातील ओझरे येथे रक्तदान शिबिर

Panchgani news : महाशिवरात्र निमित्त जावळी तालुक्यातील ओझरे येथे रक्तदान शिबिर

पाचगणी न्यूज नेटवर्क/ अजित जगताप
मेढा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यात ओझरे या ठिकाणी वार्षिक यात्रा व महाशिवरात्र निमित्त रक्तदान शिबिर झाले. गेली नऊ वर्ष सामाजिक जाणिवेतून वेण्णा फाउंडेशन ही सामाजिक संस्था रक्तदान आयोजित करत आहे.

जावळी तालुक्यामध्ये ओझरे गावच्या वेण्णा फाउंडेशन म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटणारी सामाजिक संस्था आहे. नाते माणुसकीचे जपावे तसेच शैक्षणिक कार्यामध्ये सरळ हस्ते सहकार्य करावे. असे या ठिकाणचे ग्रामस्थ मनोभावे मानतात..

गावचं गाव पण टिकून ठेवण्यासाठी संस्कार महत्त्वाचे आहेत. आणि या संस्काराची शिकवण देणाऱ्या सातारा जिल्हा परिषद ओझरे शाळेची स्वच्छता व स्थानिक विद्यार्थ्यांना ज्ञान अमृत मिळावे. या उद्देशाने सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेची भव्य इमारत सुद्धा उभी राहिलेली आहे. विविध शैक्षणिक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती घडवली आहे. या क्रांतीचे सर्वच साक्षीदार आहेत. विद्यार्थी व गुरुजन आणि ग्रामस्थ यांचा त्रिवेणी संगम पाहण्यास मिळाला आहे. महाशिवरात्र निमित्त गजर भक्तीचा.. सोहळा रक्तदानाचा त्याचबरोबर वार्षिक यात्रेची आरती व आराधना पुजाअर्चा आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने झाला आहे. तरुण पिढी रक्तदात्यांच्या योगदानामुळे गरजूवंतांना रक्ताचा पुरवठा होत आहे. त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून ग्रामस्थांच्या नेत्राची काळजी घेण्यात आलेली आहे. ग्रामस्थांची एकजूट अखंड राहिलेले आहे. त्याचे कौतुक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले आहे.

ओझरे गावचे सरपंच व उपसरपंच अजित मर्ढेकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी धनावडे, युवा उद्योजक सुनील मर्ढेकर, अशोक लकडे गुरुजी, प्रमोद इंगुळकर, मच्छिंद्र कदम, वसंत लकडे, भरत लकडे, प्रताप मर्ढेकर, रामदास धर्माधिकारी यांच्यासह ग्रामस्थांनी ही मोलाचे सहकार्य केले आहे. या सर्वांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनापासून कौतुक केले आहे. ओझरे गावच्या विकासासाठी नेहमीच ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले असल्याचा उल्लेख अभिमानाने ग्रामस्थांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : पुस्तकांच्या गावी जयदीप कवाडे यांची सदिच्छा भेट; वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी उपक्रमाचे...

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी :भिलार येथील 'पुस्तकांचे गाव' या अभिनव उपक्रमाला महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...

Panchgnai news : पाचगणीत रोटरी क्लबतर्फे विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव; व्यावसायिक व जिल्हा पुरस्कारांचे...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी : ​आपल्या कौशल्याने समाजावर ठसा उमटवणाऱ्या आणि व्यावसायिक क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पाचगणीच्या वतीने विशेष...

Panchgani news : गोडवलीत ‘श्री स्वामी समर्थ प्रकट दिन’ सोहळा उत्साहात; पालखी सोहळा आणि...

पाचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. "भिऊ...

Panchgani news : जावली पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व; सभापतीपदी सौरभ शिंदे तर उपसभापतीपदी गोरख...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​मेढा : ​संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जावली तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा सस्पेन्स अखेर संपला असून, भारतीय जनता पक्षाने...

Panchgani news : महाबळेश्वर पंचायत समितीवर ‘युती’चा झेंडा; शकुंतला चोरमले सभापती तर संजय मोरे...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुका पंचायत समितीच्या सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या...

error: Content is protected !!