पाचगणी न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबई तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सन २०२४-२५ उत्कृष्ट बँक स्पर्धेत सातारा, जावली, मुंबई कार्यक्षेत्र असलेल्या दि जावळी सहकारी बँक अव्वल ठरली आहे.
मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशनने बृहन्मुंबई मधील सहकारी बँकांच्या ठेवींमध्ये वाढ व्हावी त्याचबरोबर बँक व्यवस्थापन व इतर बँकिंग अनुषंगिक बाबींचा विचार करून आसोसिशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. या सर्व निकषांमध्ये डी एम के जावळी सहकारी बँक ही अव्वल ठरली असून, संपूर्ण बृहन्मुंबई मधून जावळी बँकेने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
१००१ ते ५००० कोटी ठेव गटातून डी एम के जावळी सहकारी बँकेने हा क्रमांक पटकावला आहे. यानिमित्ताने बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत असणारे जावळी सहकारी बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे, चेअरमन विक्रम भिलारे, व्हाईस चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्यासह संचालक मंडळाचे जावळी तालुका, वाई तालुका, खंडाळा तालुका, त्याचबरोबर मुंबईमधील जावळी सहकारी बँकेच्या सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान पांचगणी शाखेत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संचालक अजित कळंबे यांनी सभासद , आणि नागरिकांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा केला. 
जावळी बँकेचे सर्व संचालक,मार्गदर्शक तसेच कर्मचारी व सभासदांच्या सहकार्याने बँकेचे उत्तम कामकाज सुरू असून बँक प्रगतीपथावर आहे. सर्वांच्या सहकार्यानेच हे यश बँकेने मिळवले आहे.
विक्रम भिलारे चेअरमन
























