Homeसामाजिकबुलंद नेतृत्व.....सुनील बगाडे

बुलंद नेतृत्व…..सुनील बगाडे

पाचगणी न्यूज नेटवर्क
खुदी कर बुलंद इतना की हर तकदीर से पेहले खुदा खुद बंदे से पुछे बता तेरी रझा क्या है…!या सुप्रसिद्ध उर्दू शेर नुसार प्रयत्नांच्या वेलीवर यशाची सुंदर फुले फुलतात याचे एक उत्तम उदाहरण बनून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे सुनील बगाडे हे पांचगणी शहरातील मुकुटमणीच!!! ममतेची पाखर हरवलेल्या पण वडिलांच्या संस्कारावर, स्वतःला सिद्ध करून दाखवणाऱ्या सुनील शरद बगाडे या पॉवरफुल व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस, त्यानिमित्त..

पाचगणी व गिरीस्थानावरील राजकीय पटलावर बगाडे कुटुंबाचे वेगळे महत्व आहे. अण्णा बगाडे यांनी आपली वेगळी छाप पाडली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र शरद बगाडे या सुशिक्षित युवकाने पांचगणी नगरपालिकेत सकारात्मक राजकारण केले. न्यू इरा हायस्कूल मध्ये नोकरी करून त्यांनी आपली वेगळी छाप साजविकासात साधली. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सुनील बगाडे हे ही त्यांचीच सकारात्मकता घेऊन समाजकारणात उतरले आहेत.

सुनील बगाडे हे पहिल्यापासून समाजाशी निगडित व्यक्तिमत्व आपल सार शिक्षणं न्यू इरा स्कूल मध्ये झाले त्यानंतर त्यांनी पुण्याला आपले पुढील शिक्षण घेऊन त्यांनी एरलाईन्स मध्ये जाण्याचे स्वप्न मनी बाळगले. अपार मेहनत आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी निळ्या आकाशात उडण्याचं स्वप्न पूर्ण केले. आई वडिलांचे आशिर्वाद आणि प्रयत्न त्यांच्या यशाच्या कामी आले. अख्ख जग कवेत घेण्याची त्यांनी बाळगलेली मनिषा सत्यात उतरवली आणि
या नोकरीतून त्यांनी जगभराची सैर केली.

आपल्या समाजातील युवक उत्तुंग भरारी घेत आहे ही कल्पनाच सर्व पांचगणीकरांणा भावली. पण काम करीत असताना घार फिरे आकाशी चित्त आपल्या पिलापाशी या उक्तीप्रमाणे घरच्यांचे समाजकारणाशी जोडलेले नाते आणि संस्कार त्यांना साद घालत होते. सुनील यांनी १० वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ सेवेला विराम देत. समाजकारणाशी नाळ जोडण्याचा निर्धार केला. आणि ते पुन्हा पाचगणीकडे दाखल झाले.

इथे आपल्यावर करायचे काय याचा विचार करून सुनील यांनी रोटरी क्लब, आय लव पांचगणी या सेवाभावी संस्थांशी जवळीक साधली आणि या माध्यमातून समाजसेवेचा श्री गणेशा केला. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे ते अध्यक्ष आहेत. या माध्यमातून समजला एक ठेवण्याचे काम ते करीत आहेत. आपल्या सभोवतालच्या समानातील वंचितांच्या समस्यांचा ते नेहमी वेध घेत असतात. त्यातून त्या सोडवण्यासाठी ते पुढे येतात. यामुळे ते युवा वर्गामध्ये हवेहवेसे वाटत आहेत. युवकांचा बुलंद आवाज म्हणून त्यांचेकडे पाहिले जात आहे. जिथं प्रश्न तिथे सुनील सर हजर असतात. ही त्यांची समयसूचकता त्यांच्या यशाचे गमक आहे.

सुनील बगाडे हे शांत, सयमी आणि विचारी नेतृत्व म्हणून पर्यटन स्थळावर उदयाला येत आहे. कुठलीही समस्या त्यांचेकडे घेऊन जा त्याच्यावर तोडगा आणि ती सोडवण्याची धमक त्यांची आहे. खरंतर प्रत्येक माणसाला काहीतरी छंद असतोच..सुनील सरांनाही रनिंग, कबड्डी, क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्याचा छंद होता. परंतु हे खेळ खेळण्याबरोबरच खेळाडूना प्रोत्साहित करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. शालेय व महाविद्यालय जीवनात त्यांनी फूटबॉल खेळला महत्व दिलें. खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी व्यायाम मंडळाच्या कबड्डी स्पर्धा तसेच फुटबॉल स्पर्धा भरवण्यासाठी ते आग्रही असतात. रनिंग मध्ये अनेक स्पर्धांमध्ये सुनील सरांनी सहभाग नोंदवून अनेक पारितोषिके पटकावली आहेत.

कमी बोलणे आणि जास्त काम करणे हा सुनील सरांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे त्यांच्या या यशस्वी कामाचे रिपोर्ट कार्डच त्यांना भविष्यात अनेक पदे मिळवून देणार आहे. यात शंका नाही. परंतु समाजाचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी कायम असतो परंतु नुसत्या राजकारणात पोट भरणार नाही म्हणून त्यांनी अलीकडेच आपल्या अटलांटिस वर्ल्ड वाइड ट्रॅव्हल फर्म सुरू करून आर्थिक प्रगती साधली आहे. यातून आपल्या शहर पा परिसरातील लोकांना ते जगभर भ्रमंती करण्याचे मार्गदर्शन आणि सफर घडवित आहेत.

खरंतर,सुनील बगाडे म्हणजे स्वतः आकाशात उडान करण्याची स्वप्न पाहणारा अन लोकांची जगभराची सैर पूर्ण करणारा आकाशविर..!या माणसाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपली इच्छा पूर्ण करून सर्वांच्या मनात असणारी स्वप्न पूर्ण करताना त्यांना आपल्याशी कायमच जोडून ठेवलं आहे. ही माणसंच आपली संपत्ती मानणाऱ्या या अवलियाला त्यांच्या कर्तृत्वाला आणि प्रयत्नवादी वृत्तीला मानाचा मुजरा…!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : जावली पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व; सभापतीपदी सौरभ शिंदे तर उपसभापतीपदी गोरख...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​मेढा : ​संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जावली तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा सस्पेन्स अखेर संपला असून, भारतीय जनता पक्षाने...

Panchgani news : महाबळेश्वर पंचायत समितीवर ‘युती’चा झेंडा; शकुंतला चोरमले सभापती तर संजय मोरे...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुका पंचायत समितीच्या सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या...

Panchgani news : महाबळेश्वर पंचायत समिती सत्तेचा पेच: राष्ट्रवादीकडे सभापतीपद निश्चित, मात्र उपसभापतीसाठी ‘टॉस’...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा बिगुल वाजला असून, सोमवारी (दि. १६ मार्च) होणाऱ्या या प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे...

Panchgani news : जावली पंचायत समिती सभापती निवडीचा सस्पेन्स वाढला; कोणाची वाजणार ‘शिट्टी’? चुरस...

पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा : जावली तालुका पंचायत समितीच्या सोमवारी होणाऱ्या सभापती निवडीकडे आता तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या...

Panchgani news : ईश्वरी गोळेची जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत भरारी; भोसे शाळेच्या लौकिकात पडली भर

पांचगणी न्यूज नेटवर्क ​भोसे : महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर जिल्हास्तरावर आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक...

error: Content is protected !!